रविवार, २० एप्रिल, २०१४

"झुकणार नाही.."-
कुणाची व्यथा,
होते कुणासाठी कथा..
ऐकावया बसला,
पहा तिथे जथा..।।१।।
सारेचं वरवरचे,
नुसते देखावे..।
हुंकार सुस्कारे,
केवल नटवे..।।२।।
सोसता सोसेना ,
पल पुढे पले..
सावरावे कसे,
मुली ना कले..।।३।।
आता झेलायची ,
कडकडीत उन्हे..।
त्यापाठोपाठ येणारी,
झंझावती वादले..।।४।।
असो कोणीही कसा,
राजा अगर रंक..।
नितीतत्वचं खात्रीने ,
करतील सोबत..।।५।।
अटीतटीच्या संग्रामात,
हटणार नाही..।
अस्तित्व विरले तरीही,
झुकणार नाही..।।६।।
-रो..

जागतिक ऑटिझम जागृती दिन ह्या निमीत्ताने एक शिक्षीका ह्या भूमिकेतून माझा ह्या विद्याथ्र्यांचा एक अनुभव........" 
पुढील वाटचाल.."
---तो असतोचं सोबत माझ्या ,
पण जेव्हा इतर गोला होतात माझ्याभोवती..
तेव्हा तो असतो कुठेतरी,
कोपर्यात..
एकटाचं, 
माझ्याकडे बघत..
सतत जागरुक ठेवतो मला,
त्याच्यासाठी अन माझ्यासाठीही..
जावे लागते मलाचं समीप,
कदाचित माझ्यासाठी..
कारण तो माझा शब्द डावलत नाही,
इतरांचे मात्र काहिचं ऐकत नाही.. 
म्हणून मी अस्वस्थ त्याच्यासाठी..
तो नाही लिहू शकत,
क का कि की..
तो नाही गावू शकत सुंदर सुंदर गाणी..
पण एक मात्र खरं,
इतरांसाठी असतं त्याच्या डोल्यात पाणी..
आताचं कुठेतरी कलतयं ,
त्याचे त्याला..
मिसलू पाहतोय, 
संवाद साधतोय ,
आकार येतोय जगण्याला..
आईवडीलांपेक्षाही कदाचित 
मी त्याच्या लेखी महत्वाची,
म्हणूनचं नित्य कालजी वाटते,
त्याच्या पुढील वाटचालीची..
पुढील वाटचालीची..
-रो..

जाता येता,
दिसतात चेहरे..।
काही ओलखीचे
काही अनोलखी..।
काही सुकलेले,
काही फुललेले..।
काही हसरे,
काही गहीरे..।
काही निश्चयी,
काही उच्छ्रंखूल..।
काही सावरलेले,
काही बावरलेले..।
काही सजीव,
काही निर्जीव..।
काही खोडकर,
काही गप्पगार..।
काही साकार,
काही निर्वीकार..।
काही बोलके,
काही मुके..।
पण,
ह्यातील थोडेचं असतात आपले,
बाकी सारे परके..।।
-रो..