शनिवार, २८ एप्रिल, २०१२


"पतंग" 
  पतंग शोधत असतो 
त्याचं स्वतःच आकाश,
भिरभिरत असतो वेगात खुशाल..
निळे काळे पिवळे किती हे पतंग,
कोणते रंगरुप ना खेद ना खंत.. 
आपण ही एक पतंग होवू या, 
आकाशाला आपल्या कवेत घेवू या..
नशिबाच्या दोरीला हुलकावणी देवू या,
बेभान वार्यासंगे बेभान होवू या..!!