गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

हवं ते मिळालं नाही की
आपण नशिबाला दोष देतो
हवं आहे ते मिळालं की 
आपण आपल्याच मस्तीत असतो 
प्रयत्नांची हवी पराकाष्ठा
हवे ते मिळवण्यासाठी 
विधाताही देईल आशीर्वाद
प्रयत्नांच्या पाठोपाठी 
वाट जिकडे जाईल तिकडे
आपण जायचं नसतं
आपल्या वाटानां वळण 
आपणच द्यायचं असतं
उगीचंच आपल्या स्वत्वाला 
कुठेही झुगारायचं नसतं 
मनातलं ठिकाण मिळालं तर
मागे मुळीच हटायचं नसतं 
नकोश्या माणसांमध्येही 
हवं ते शोधायचं असतं 
हव्याहव्याश्या मानसांना 
नित्य स्मृतीत जपायचं असतं 
काळ हा पुढेच जाणार 
गणित हे समजून घ्यायचं असतं 
आपल्या आयुष्याचं चित्र 
आपणंच रेखाटायच असतं 
जे नाही मिळाले त्यासाठी 
झुरत बसायचं नसतं 
प्रत्येक क्षणाचा आनंद लुटून 
आयुष्य महोत्सवासम जगायचं असतं

रविवार, ८ जानेवारी, २०१२

प्रवास..
गर्द हिरवी ही झाडी,
गर्द निळे आकाश,
परी एकटीच मी आहे,
अन एकटीचा प्रवास..

दिसतो प्रकाश थोडा,
वाटतो बहु आनंद,
विचारते माझी सावली, 
येऊ का तुझ्या संगे..

प्रकाश आधीच दिसतो,
अंधारच दाट हा,
नको सावलीचीही सोबत, 
तो भारही न साहावे पहा..

जा पुढे भास्करा निघोनी,
मला खेद्खंत नाही,
मी राहील एकटी,
संपेल असाच प्रवास ही..  

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

? प्रश्न ?

उत्तरे सर्व माहित असूनही,

 काही पडलेले प्रश्न आहेत,

मनात घोंघावणारे हे प्रश्न,

 अन त्यांची न मिळणारी,

 उत्तरे आहेत..


क्षणा क्षणाला मी वेडी ठरतेय,

पण उत्तरे मात्र मिळत नाही,

 वेडी असले तरी कळतय,

 बुद्धीने दिलेली उत्तरे,

 सुख देत  नाही..


विचारावीत कोणाला हे सारे प्रश्न,

 संभ्रमात मी भोळवंडते आहे,

 प्रश्न निर्माते मात्र,

 बुद्धीने उत्तरे देवून केव्हाचेच,

 मोकळे आहेत..