सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

"मी पाऊस झाले..!!"

 तुझ्या आवेगात,
सचैल न्हाले..।
 तू ऐसा बरसलास,
मंत्रमुग्ध झाले..।।१।।
 ओलसर गंधमय,
स्पर्शिता वारे..।
तनुवरी उमटले,
सुखद शहारे..।।२।।
 कालजात गर्जले,
श्यामल मेघ सारे..।
वीज चमकता ,
प्रकाशी धुमारे..।।३।।
तुझी उत्कट भाषा
शब्द माझे थिटे..।
अबोल संवेदनांना ,
अंकुर फुटे..।।४।।
मनीच्या आभालाला ,
कुठले किनारे..।
तुझ्यासवे मीही,
पाऊस झाले..।।५।।
पाऊस झाले......
!-रो..

"'धुके.."
ढगांच्या फटीतून सटकली,
प्रकाशाची उनाड किरणे..।
हटता धुक्याची दुलई,
चमकली झुंबर पाने..।।१।।
अनावृत्त डोंगरमाथा,
पाही वाक वाकून..।
कुठे मेघांचे दाट पटल,
कुठे पारदर्शी खूण..।।२।।
ऐसे सृष्टीचे वैभव,
लोभस विश्व हरवलेले..।
अंधारातून अंधूक अंधूक,
प्रकाशाकडे विस्तारलेले..।।३।।
अनुभव इतका गूढ,
ऐसा भासला गहिरा..।
तेजस्वी वस्राची कांती
विरला मौनात पसारा..।।४।।
ती आगलीक पाहूनी,
सदगदित झाले..।
ब्रम्हांनंदी टाली लागली,
पुरती भरुनी पावले..।।५।।
-रो....