रविवार, २० मार्च, २०११

प्रत्येकजण प्रेमाच्या शोधात आहे ,खरं तर,प्रेम ही शब्दात न मांडता येणारी भावना...तरीही...
   " प्रेम" म्हणजे काय?त्यातल्या त्यात "खरं प्रेम म्हणजे काय हे शब्दात मांडण्याचा ह्या कवितेत एक छोटासा,लाडिक प्रयत्न...    


 

"खरंप्रेम.."  
एखाद्याचा चेहरा सदैव नजरेत असणं म्हणजे प्रेम... 
ईश्वराच्याही आधी नकळत एखाद्यासमोर मस्तक झुकनं म्हणजे प्रेम... 
नि:शब्दातूनही हृदयाचे सूर छेडले जाणं म्हणजे प्रेम... 
दूर अंतरावर असूनही मायेची ऊब जाणवण म्हणजे प्रेम...
अनंत अपराधांना क्षमाशीलतेची जोड असणं म्हणजे प्रेम... 
दोन जीवांचं अद्वैतात होणार रूपांतरण म्हणजे प्रेम...
नाश्वरातेच्या केवळ तडाख्यानेही नजरेतील चैतन्य जाण म्हणजे प्रेम...
श्वासाइतकचं जीवनात अद्वितीय  स्थान असणं म्हणजे प्रेम...
सर्वस्वाचा होम करुनी समर्पणाची परम्मोच्चता गाठणं म्हणजे प्रेम... 
अश्या प्रेमाचं भक्तीत अन विश्वासाचं श्रद्धेत होणारं शाश्वत रुपांतरण म्हणजे... 
"खरं प्रेम..."