रविवार, २० एप्रिल, २०१४

जागतिक ऑटिझम जागृती दिन ह्या निमीत्ताने एक शिक्षीका ह्या भूमिकेतून माझा ह्या विद्याथ्र्यांचा एक अनुभव........" 
पुढील वाटचाल.."
---तो असतोचं सोबत माझ्या ,
पण जेव्हा इतर गोला होतात माझ्याभोवती..
तेव्हा तो असतो कुठेतरी,
कोपर्यात..
एकटाचं, 
माझ्याकडे बघत..
सतत जागरुक ठेवतो मला,
त्याच्यासाठी अन माझ्यासाठीही..
जावे लागते मलाचं समीप,
कदाचित माझ्यासाठी..
कारण तो माझा शब्द डावलत नाही,
इतरांचे मात्र काहिचं ऐकत नाही.. 
म्हणून मी अस्वस्थ त्याच्यासाठी..
तो नाही लिहू शकत,
क का कि की..
तो नाही गावू शकत सुंदर सुंदर गाणी..
पण एक मात्र खरं,
इतरांसाठी असतं त्याच्या डोल्यात पाणी..
आताचं कुठेतरी कलतयं ,
त्याचे त्याला..
मिसलू पाहतोय, 
संवाद साधतोय ,
आकार येतोय जगण्याला..
आईवडीलांपेक्षाही कदाचित 
मी त्याच्या लेखी महत्वाची,
म्हणूनचं नित्य कालजी वाटते,
त्याच्या पुढील वाटचालीची..
पुढील वाटचालीची..
-रो..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ