शनिवार, १ मार्च, २०१४

करुणा  
 
नको तो रंगमंच,
 नको ती नाटके ..
विटले मन आता,
पाहुनी मुखवटे ..1

प्रत्येक मुखवट्याचा,
रंग आगळा..
 बाहेरी एक,
आत नाना कळा..2

जो तो येथे आहे,
नित्याचा भुकेला..
पदरी पडता चतकोर,
 लाचारीने हसला ..३

सोबत्याच्या हातातही,
 स्वार्थीयाचा पेला..
 एकाचा भरता,
दुजियाचा सांडला.. ४

चाल ही दुडकी,
 वाट असे विनाशाची..
 प्रवास नको आता ,
पायही अडती ..५

मी एक वेडी ,
उगीचचं थांबते ..
येऊ दे जाग देवा ,
करुणा भाकते ..६