मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३


घनदाट आभाल,
झुकले खालती..।
धो धो बरसले,
धरतीवरती..।।
अंधारुन आले,
वरती खालती..।
कालजात ठोके,
भावनांना भरती..।।
ढगांचा गडगडाट,
निपचीत माती..।
विजांची किनार,
आभालाभोवती..।।
बुडतोया दिन,
पाण्याखालती..।
अजून शहारा अंगावरती..।।
उतावील स्वप्ने ,
डोल्यांखालती..।
धूमसता धूर,
तेवत्या ज्योती..।।
संवेदना अस्फुट,
पाऊस प्रीती..।
घनदाट आभाल,
लाजली धरती..।।
-रो..  

मी माणसांना ऐकत नाही,
कारण ती खोटं बोलतात..।
मी माणसांच्या डोल्यातही पहात नाही,
कारण ती नजर चुकवतात..।
 माणसांकडून काही शिकतही नाही,
कारण ती मुखवटे धारण करतात..।
मी फक्त माणसं पुन्हा पुन्हा वाचते,
माझ्या प्रिय पुस्तकांसारखी..।
अनुभवते सर्वानां ,
अगदी स्वतःच्या पातलीवर नेवून..।
त्यांच्यातला आवडता मजकूर,
हृद्यात ठेवते..।
नावडता देते,
उंच आकाशात भिरकावून..।।
-रो..    

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

डोल्यातल्या भावनांना,
नभाने वेचले..।
क्षितीजाच्या पापणीला,
आनंदाश्रू आले..।।
कालजाचे पानही,
क्षणभर थिरकले..।
सरसरुन सृष्टीने ,
मल्हारास आलविले..।। 
सुरेख पंख,
समुद्रासी फुटले..।
बंध लाटांचे सुटता,
बेभानपणे बरसले..।।
डोंगरही खुल्यागत,
पलभर झुलले..।
रिमझीम सरींनी,
ओलेचिंब भीजले..।।
ऐसेची सोवल्या धुक्यात,
मी न्हाले..।
भूवरी असूनही,
नभाला शिंपले..।।
-रो.. 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

**तुझीचं गीते..** 

श्यामल मेघ ,
एकसंघ पसरलेले..।
झाडावरचे शहारे,
नाही अजून मावललेले..।।
जरी उशिराचं आलास,
तरी तुझी नवलाई..।
सांडून नाही देणार,
झेलून घेईल हातावरी..।। 
ओलसर गंधमय वारा,
पानांपानांतून चालला..।
अलगद स्पर्शुनी अंतरासी,
संवेदना चेतवूनी गेला..।।
झुलवत झुलवत झुलला,
मनाचाही मोर..।
वसुंधरा सुस्नात,
अवघ्या सृष्टीस मोहोर..।।
संतत धार धरे,
ऐसा कैसा छंद..।
नादमयता लोभस,
मृत्तिकेचा मंद गंध..।।
तू आला जरी सैराट,
होवूनी विराट..।
गातिल तुझीचं गीते,
सृष्टीचे हे भाट..।।
-रो..

रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

ज्यांना द्यायची असतात फूलं,
त्यांनाच काटे दिली जातात..।
नकलतपणे दिलेल्या वेदना,
आपलीच पाठराखणं करतात..।।१।।
 खपली निघून गेली की,
जखम भलभलत राहाते..।
आतमधल्या आतमध्येच,
सारखीच कुरतडून घेते..।।२।।
 कधीतरी मग आपले शब्द ,
आपलेच वैरी होतात..।
वेदना देण्याची मनिषा नसताही,
आपला सहजपणे घात करतात..।।३।।
 क्षमायाचना तरी कशी करावी,
अपराधीपणा सारखाच नडतो..।
भयावह झालेल्या मनाला,
शब्द देखील अडवून धरतो..।।४।।
मनातलं दुःख अश्यावेली,
मनालाचं गिलून घ्यावं लागतं..।
अंतरात अश्रूंना दडपून ,
फक्त हसतं राहवं लागतं..।।५।।-रो..
 
Photo: ज्यांना द्यायची असतात फूलं,त्यांनाच काटे दिली जातात..।नकलतपणे दिलेल्या वेदना,आपलीच पाठराखणं करतात..।।१।। खपली निघून गेली की,जखम भलभलत राहाते..।आतमधल्या आतमध्येच,सारखीच कुरतडून घेते..।।२।। कधीतरी मग आपले शब्द ,आपलेच वैरी होतात..।वेदना देण्याची मनिषा नसताही,आपला सहजपणे घात करतात..।।३।। क्षमायाचना तरी कशी करावी,अपराधीपणा सारखाच नडतो..।भयावह झालेल्या मनाला,शब्द देखील अडवून धरतो..।।४।।मनातलं दुःख अश्यावेली,मनालाचं गिलून घ्यावं लागतं..।अंतरात अश्रूंना  दडपून ,फक्त हसतं राहवं लागतं..।।५।।-रो..

शाश्वततेचे आकाश.. 

अंधार इतुका झाला,

झाली अंधाराची भिंत..
कशी कुणाला कलेना,
नारिच्या हृदयातील खंत..।। 
आहे मला जगायचे,
माणूस हे माझे अस्तित्व..
पारखू नका हो ठायी ठायी,
माझ्यातील स्वत्व..।।
माझ्यात वसते पत्नी ,
माझ्यात वसते ताई..
हिणवू नका मला हो,
मी आहे निसर्ग आई..।।
ज्योतीस ज्योत लावा,
भेदू त्या अंधारास..
उजलवू या जगति, 
सौख्य समृद्धीचा प्रकाश..।। 
मी कर पुढे सारिले,
तुम्ही कर गुंफा हो..
गाठूया आपण सारे,
शाश्वततेचे आकाश हो..।।
-रो..