सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

अनंताचे प्रवासी ..
कुणी नसे सोबती 
कुणी नसे सांगाती 
असतो आपण एकटे 
अनंताचे प्रवासी ..
कितीही पेरीत जा 
भलेपनाची फूले,
वाट्यास येती
 वेदनामय काटे ,
वेदना मनीच्या 
कुणीही न जाणती,
असतो आपण एकटे 
अनंताचे प्रवासी..१
प्रत्येकजण असतो 
स्वार्थाने बरबटलेला ,
स्वत:च्या सुखातच
लोळत पडलेला,
गावीही नसते भावना 
आपल्या एकटेपणाची 
असतो आपण एकटे 
अनंताचे प्रवासी .. २
कितीही साथ दिली निष्ठेने 
साथही अपुरी पडते ,
दुसर्या बाजूने मात्र 
ठोकरच लागते ,
जाणीवही नसते 
आपल्या निष्ठेची,
असतो आपण एकटेच
अनंताचे प्रवासी..३   

रविवार, २३ डिसेंबर, २०१२

एक जिवंत अनुभव.." 

 मरणार्यला जगवते,
अनाथांची माय..
इतरांसाठी जगा सांगते,
 गरीबांची आय..।।
 दोन हस्तक तिसरे मस्तक,
चालत ठेवते पाय..
परिस्थीतीपुढे नमू नका,
सांगत फिरत जाय..।।
 जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र,
नऊवारी माझी बेस्ट..
करते अविश्रांत कष्ट,
 कॉलर ताठ हाय..।।
हाफ टाईम चौथी पास,
तरीही मी अडाणी नाय..
सिंधुताई सपकाल म्हणत्यात मला , 
माई   नावाची मी साय..!!!- "रो..