रविवार, २० एप्रिल, २०१४

"झुकणार नाही.."-
कुणाची व्यथा,
होते कुणासाठी कथा..
ऐकावया बसला,
पहा तिथे जथा..।।१।।
सारेचं वरवरचे,
नुसते देखावे..।
हुंकार सुस्कारे,
केवल नटवे..।।२।।
सोसता सोसेना ,
पल पुढे पले..
सावरावे कसे,
मुली ना कले..।।३।।
आता झेलायची ,
कडकडीत उन्हे..।
त्यापाठोपाठ येणारी,
झंझावती वादले..।।४।।
असो कोणीही कसा,
राजा अगर रंक..।
नितीतत्वचं खात्रीने ,
करतील सोबत..।।५।।
अटीतटीच्या संग्रामात,
हटणार नाही..।
अस्तित्व विरले तरीही,
झुकणार नाही..।।६।।
-रो..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ