सोमवार, २४ जून, २०१३

 
*बाप..*
कलत नाही कधी कधी,
बाप म्हणजे काय असतो..
निव्वल मायेचा स्पर्श की,
कठोरपणाचा धाक असतो..।।१।।
 व्हावं लागत व्यवहारी कठोर,
आपल्या गोड पिल्लांसाठी..
ह्या निर्दय निष्ठुर जगात ,
ठामपणे उभं राहण्यासाठी..।।२।।
वाटतं असत बर्याचवेला ,
निर्णय बदलतो त्यांचा..
करत असतात मनोमन, 
विचार सर्वांचाच..।।३।।
स्वतः राहतात नित्य ,
निखार्याने पोलत..
धगही लागू देत नाही,
जरी असतात जलत..।।४।।
आईसम उतराई ,
नाही होवू शकत त्यांची..
दिले सुरक्षित जीवन,
अन स्वाभिमान सोबती..।।५।।
देवा उदंड आयु आरोग्य,
लाभू दे त्यांना..
मायेचे छत्र जन्मभर ,
हवे आम्हा भावंडांना..।।६।।
-रो..