सोमवार, १९ सप्टेंबर, २०११


'उगीचच..'
वाटत आपणही व्यवहारी 
अन गणिती बनावं,
सगळ कसं नीट
हिशेबात बसवावं,
नुसत व्याकुळ होऊन 
उगीचच स्वत:च स्वत:ला कशाला सतावाव..?

भावनांचे कढ काय
येतात अन जातात,
ऋतूंचे बहार जसे 
बहरतात अन ओसरतात,
उगीचच पापण्यांना कशाला तिष्ठत ठेवावं..?

संवेदनांची जाण असण
कधी खंजीर बनून जात,
मनाच्या हळव्याक्षणात 
 एकटेपणाची जाणीव करून देत,
उगीचच मनाला बेफामतेकडे कशाला झुकवाव..? 

खरचं वाटत कधी कधी आपणही,
व्यवहारी अन बनावं गणिती बनावं..!!!     

शनिवार, १० सप्टेंबर, २०११


भावनांचे मनोरे..

असाही पाऊस येईल
असे कधीच नव्हते वाटले,
माझ्या हृदयातच जणू
काळे मेघ दाटले..

कोसळतो आहे सारखाच
पण पूर मात्र येत नाही,
गळती होतेय सारखीच
मुळीच कशी थांबत नाही..

नव्हते मागितले फार काही,
ओलावा क्षणाचाच मागितला
तो ही ह्या काळ्या मेघांनी,
पुरता झाकळून टाकीला..

भोगले शाप सारे,
हा ही   शाप भोगावा का?
मरतांना हृदयातूनच,
जगण्याचा उ:शाप  कशाला हा..?

नको कोंब जीवनाचा ,
वाहून गेले सारे 
सुंदर भावनांचे मनोरे,
जळून खाक झाले..