रविवार, २६ जानेवारी, २०१४

नौबत

नका हो करू ,
स्वप्नांचा भंग..
रंगासम मिसळूनी ,
राहू या ना संग ..१
सारु या अहंकाराला
 थोडेसे बाजूला..
पडतील गळ्यात
यशाच्या माळा..२
झटका आळस
 लागा कामाला.. 
कर्तुत्वाचा सेतू 
बांधू या चला ..३
संयमाची ढाल ,
नीतीची तलवार..
शांततेने घालू
संस्काराचा जागर..४ 
कशाला पाहायचे
काय उणे काय दुणे..
एकसंघ होऊनी
 उत्कर्षाप्रत जाणे..५ 
नकोत रणकंदन
चिमुकल्या जीवाला ..
नंदनवन फुलवण्याची
आस लागली मनाला..६
 करा हात पुढे
 द्या हलकीशी सोबत..
वाजतील नगारे 
झडेल नौबत..७   
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

कुणावर  काहीही लादण ,
हा माझा स्वभाव नाही..
 सदिच्छाना  माझ्या, 
तुमचा नक्कीच नकार नाही..
जन्म मृत्यू मधील प्रवास,
क्षण क्षण जगून घ्या..
 विश्वासाने नाते जपा,
 स्वत;लाही समजून घ्या..
आतला आवाज नेहमी,
घालीत असतो साद..
 वरवरच्या अवडंबराला,
देवू नका कधीच दाद.. 
इतुकेच सांगणे केवळ ,
अंतरीच्या काळजी पोटी..
 प्रवास सुखाचा होवो, 
हेच शब्द ओठी..