शनिवार, १७ डिसेंबर, २०११

शोध

हा शोधच वेगळा
कंपनातून निघणारा अन 
श्वासात अडकणारा..

हा शोधच वेगळा 
निर्मोहीतून निघणारा अन 
निर्लेपात अडकणारा..

हा शोधच वेगळा
शब्दातून निघणारा अन
नि:शब्दात अडकणारा..

हा शोधच वेगळा
कटाक्षातून निघणारा अन 
हृदयात अडकणारा..

हा शोधच वेगळा
थरथरत्या स्पर्शातून निघणारा अन 
नि:स्पर्शात अडकणारा..

हा शोधच वेगळा
क्षितीजातून निघणारा अन 
सीमारेषेत अडकणारा..

हा शोधच वेगळा 
आत्म्यातून निघणारा अन 
परमात्म्यात अडकणारा..

हा शोधच वेगळा
विश्वातून निघणारा अन 
अनंतात अडकणारा..

हा शोधच वेगळा
माझ्यातून निघणारा अन 
अंती तुझ्यातच विलीन पावणारा..