रविवार, १३ मे, २०१२

 

"पवित्र आशा..''

पवित्र भावनांची,
पवित्र आरती..
पवित्र ज्योतिंची,
पवित्र किर्ती..।

पवित्र संग,

पवित्र निःसंग..
पवित्र हृदयान्ती,
पवित्र अंग..।
पवित्र विचार,
पवित्र कृती..
पवित्र जाणिवांची,
पवित्र मती..।

पवित्र जनन,

पवित्र मरण..
पवित्र संसारान्ती,
पवित्र जीवन..।

पवित्र पूजा,

पवित्र दिशा..
पवित्र मनाची,
पवित्र आशा..।।

"निरपेक्ष.."

सतारीच्या तारांत,
असता अंतर..
त्यातून सूर जुळती,
नित्य सुस्वर..।

तरु ही असता,
समान अंतर..
बहरुन येती,
देती सुंगधी सुमन..।

पाऊलेही असता,
विलग सत्वर,
प्रवास करुनी दाविती,
सृष्टी निर्मल..।

नाते ही असेच,
असावे सुंदर..
निरपेक्ष असूनही,
सोबत निरंतर..।।





ताल-स्वर..'
ताल-स्वरांचे अतूट नाते,
असते सुंदर बहु मजेचे..
ताल देत असे ठेका,
धा धिं धा धा धिँ धा..
स्वर घेत असे ताना,
सा रे ग म प ध नि सा..
ठेका चुकता स्वर अडे,
स्वर सुटता ठेकाही कुढे..
तालात वसू द्या सुरात स्वर,
स्वरात असू द्या ताल बराबर..
फुंकरता फुले बासरीचा ताना,
नका करु आता उगा बहाणा..
हळूच छेडा सतारीची तार,
सोसणार नाही तिजला भार..
ढोलकीचीही येवू द्या ढमढम,
घुंगरुही गातील बघा छनछन..
वाद्यांची जुळे ही सुंदर रीत,
गीत नव्हे ते बनते संगीत..
ऐसे गाणे मंजूळ गाणे,
सुस्वर त्या मैफलीत रंगणे..
सदैव रमणे..।।

 
 
"गीत-मोगरा"

छेडले ते सूर,
स्वर झंकारु लागले..
मोगर्याच्या वेलीला,
डूल कळीचे आले..।

स्वरात स्वर मिसळून,

गीत घालतील कोडी..
डूल कळीचे फुलेल,
वाट पाहावी थोडी..।

गीत ऐसे सुंदर,
मंतरु लागेल अंतरी..
फुले फुलेच बहरतील,
सडा पडेल अंगणी..।

गीतांनी त्या सुंदर,
क्षण जातील मोहरुन..
मोगर्याच्या सुगंधाने,
जीवन येईल बहरुन..।।

 
"बहर"
जो करत असतो प्रयत्न,
तोच तर चुकत असतो..
जो काहीच करीत नाही,
तो फक्त हुकत असतो..।

शिखर चढत असतांना,

मुल्यांचं अधिष्ठान हवं..
पायाचं असेल पक्का तर,
कळसाने कशाला भ्यावं..।

सदसदविवेकाचं बोट धरुन,
प्रत्येक पाऊल टाकायचं.. 
प्रवासात क्षणाक्षणाला,
मागे वळून पहायचं..।

नीतीमुल्यांनी आयुष्याला,
शाश्वततेचं रुप येतं..
नातं ही मग अतूट होवून,
अवघं जिवन बहरुन जातं..।।