शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

दुसरे उद्यान...  
असेन मी नसेन मी,
कोण अन काय म्हणूनी प्रिया, उरेन मी... 
नसेन मी म्हणूनी भांबावून जावू  नकोस,
नयन ओले करुनी असा तू पाहू नकोस ...
मी नसतांना काय होईल ठावूक आहे मला,
जीवन तर सारेच जगतील उभा करुन व्यावहरिक्तेचा फणा...
निर्माण होईल पोकळी आपल्या माणसांच्या  मनात ,
भरुनही निघेल सख्या ती कालाच्या ओघात...
तुझे काय हरवेल कळतय रे मला , चैतन्य हरवलेल्या डोळ्यांनी शोधशील तू मला...
अशी तू खंत केलेली मला म़ूळीच रुचनार नाही,
जीवनात हार खाल्लेली मला म़ूळीच चालणार नाही... 
ऊठ,पुन्हा उभा रहा,फुलव तुझे दुसरे उद्यान ह्या जगात,
कोणालाही दिसले नाही तरी,असेल ना रे मी तुझ्या ढ़ुदयात...