सोमवार, २३ जुलै, २०१२

चिमुकल्याचा वसा..*
 
खूप खूप पड रे पावसा
नदीला येवू दे मोठ्ठा पूर
तुझी होडी माझी होडी
जाईल मग दूर दूर..।

नुसताच शिंपण करुन जातोस

उन्हातून हसून पाहतोस
असा कसा रे तू
लपाछपीचा खेळ खेळतोस..।

ये असा धुवांधार
वाहू दे नाले पाट
सवंगड्यांच्या खेळासाठी
तळे भरु दे काठोकाठ..।

मी आहे चिमुकला
मोरासारखे नाचायचे मला
चातकासारखी वाट पाहण्याचा 
आला आता गडे कंटाळा..।

ये रे ये रे पावसा
तुला देईल पैसा
एक झाड वाढविण्याचा
घेईल मी वसा..।।



Photo: "धरती.."
इतकी झाले कोरडी
इतकी झाले शुष्क
कशी होईल मी
एक दोन सरींनी तृप्त..
बरसायचे असेल तर
 असा काही बरसं
वाट पाहण्याची तिष्ठता
होवून जाऊ दे निरस..
असा कसा रे तू
इतका रुसला
हृदयाची हाक 
कशी कळे ना तुला..
नाही मी सागर
नाही मी नदी
आहे मी धरती
केविलवाणी माझी स्थिती..
 ये असा आवेगे
परि उत्कट वेगे
अंतरीचे फुलणे
केवळ तुझ्याच निःसंगे..।।
GN..
 धरती.."
इतकी झाले कोरडी

इतकी झाले शुष्क
कशी होईल मी
एक दोन सरींनी तृप्त..
बरसायचे असेल तर असा काही बरसं
वाट पाहण्याची तिष्ठता
होवून जाऊ दे निरस..
असा कसा रे तू
इतका रुसला
हृदयाची हाक
कशी कळे ना तुला..
नाही मी सागर
नाही मी नदी
आहे मी धरती
केविलवाणी माझी स्थिती..
ये असा आवेगे
परि उत्कट वेगे
अंतरीचे फुलणे
केवळ तुझ्याच निःसंगे..।।