समाधान.."
तू ऐकणार नाहीस माहीत असूनही,
सांगत असते पुन्हा पुन्हा..
कारण
ध्यासचं घेतलायं ,
तुला घडविण्याचा..।।
काही ना काही शोधण्यासाठी,
तुझं
धडपडणं..
वैतागून सारं काही ,
बाजूला फेकून देणं..
त्याचवेली माझ तुला
,
चुचकारतं रहाणं पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तुझं प्रश्नांचं
भेंडोल,
उत्तरासाठी ते आशेनं पहाणं.'
तुझं उत्तर तुचं शोध',
उठणार्या वलयांची ,
जाणीव आहे मला..
तुझ्या
हरवण्याच्या नेमक्या जागाही,
ठाऊक आहेत मला..
तरीही नाही अडवत
, तुला आता
पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तू शोध तुझी ,
स्वतंत्र वाट..
तू बनवं
,
तुझीचं पाऊलवाट..
काट्यांची असेल आता कदाचीत,
होईल हिरवीगार तुझ्या
श्रमाने..
आनंद देईल तुलाही अन इतरांनाही..
तुझ्या उत्तूंग कतृत्वाने,
मिलेलं
मलाही समाधान..।
कारण ध्यासचं......।।-रो..
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ