गुरुवार, २८ एप्रिल, २०११

'कृतार्थ'
सारे काही उमगले तरीही,
न उमगल्या प्रमाणे वागायचं असतं
 खरं असचं जीवन जगायचं असतं.. 

समजावताना इतरांना स्वत:च,
मनातल्या मनात रडायचं असतं 
खरं असचं जीवन जगायचं असतं..

आशेचे पंख देताना दुसर्याला,
निराशेला खोल दडवायचं असतं
खरं असचं जीवन जगायचं असतं.. 

दुसर्याचे जीवन फुलविताना आपण,
नकळत निर्माल्य व्हायचं  असतं 
खरं असचं जीवन जगायचं असतं..

एखाद्यासाठी सारे काही समर्पित करून,
जीवनात कृतार्थ व्हायचं असतं 
हो हो,असचं जीवन जगायचं असतं.. 
असचं जगायचं असतं..       

गुरुवार, २१ एप्रिल, २०११


                       " प्रिया"
एक असं नात तुझं नी माझं असावं 
ज्याला वेदनांच गाव कधी न लागावं 
रुसशील तू जेव्हा तेव्हा मी ही रुसावं 
मन भरणी करतोस का?हळूच मी पहावं ..

एक असं अतूट बंधन तुझं नी माझ असावं
 ज्याला गाठींच कोंदण कधी न लागावं
सुटू लागेल बंधन जेव्हा तेव्हा मी बावराव
तू मला येवून हळूच सावरून घ्यावं..

एक असं स्पंदन तुझं नी माझ असावं 
ज्याला अन्तीमतेच भान कधीच नसावं
बेभान होशील तू जेव्हा,तेव्हा मीही बेभान व्हावं
               विरुन जातांना प्रिया ,तू मला सावध न करावं..