रविवार, १३ मे, २०१२




ताल-स्वर..'
ताल-स्वरांचे अतूट नाते,
असते सुंदर बहु मजेचे..
ताल देत असे ठेका,
धा धिं धा धा धिँ धा..
स्वर घेत असे ताना,
सा रे ग म प ध नि सा..
ठेका चुकता स्वर अडे,
स्वर सुटता ठेकाही कुढे..
तालात वसू द्या सुरात स्वर,
स्वरात असू द्या ताल बराबर..
फुंकरता फुले बासरीचा ताना,
नका करु आता उगा बहाणा..
हळूच छेडा सतारीची तार,
सोसणार नाही तिजला भार..
ढोलकीचीही येवू द्या ढमढम,
घुंगरुही गातील बघा छनछन..
वाद्यांची जुळे ही सुंदर रीत,
गीत नव्हे ते बनते संगीत..
ऐसे गाणे मंजूळ गाणे,
सुस्वर त्या मैफलीत रंगणे..
सदैव रमणे..।।

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ