सोमवार, २२ ऑगस्ट, २०११


जगतांना जगले स्वच्छंद  
पण अशी नव्हते जगले
तुझ्या मैत्रीत मी 
स्वत:लाच विसरले..

मला माहितीय कधी कधी
खूप दुखावलंय तुला
पण गरज होती त्याची
समजून घे मला..

तुझ्या  ओठी देता हसू
खळखळून मीही हसले
दु:ख देतांना तुला
मी पुरती पिळवटून निघाले..

प्रश्न विचारतांना तुला
उत्तर मला ठाऊक होते
तरीही छळायचे ते मला
म्हणून तुला छेडले होते..

तू फक्त समाधानी रहा
अजून काही सांगणे नाही
तू  फक्त सुखी रहा
बाकी काही मागणे नाही..

नाही कोणताही स्वार्थ अन
नाही कोणतीही आसक्ती
मैत्रीची हवी सोबत मला
हीच पुन्हा दुरुक्ती..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ