सोमवार, २७ जून, २०११


"एकटेपणा"

माझा एकटेपणा कधीही एकटा नसतो

त्यातही कुणीतरी असतच

म्हणून तर तो अधिक बोलका होतो

हसतांना तर साथ देतोच तो

पण रडतानाही अश्रू पुसतो

कुणीही राखले नाही इतके इमान तो राखतो 

हाच एकटेपणा आता माझा सखा झालाय 

गर्दीतूनही नेतो मला इतका तो माझा झालाय

आता भीतीही नाही वाटत त्याची

तोच करील खरी सोबत 

खात्री आहे त्याची..   

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ