मेघ..
काही मेघच असे असतात
वेड्यासारखे बरसून जातात
ओलावाही बाकी ठेवत नाहीत
सरितेला जीवन दान देऊन जातात..
काही मेघ असे असतात
जलधारा कश्या सावकाश बरसतात
ओलाव्याचा गंध ठेवून बाकी
सरीतेला शुष्कतेकडे घेऊन जातात..
काही मेघ तर असे असतात
नुसतेच झाकळून येतात
बरसायचे तर नावच सोडा
आले तसेच निघून जातात..
मेघांच्या या ठेवणीला
अनेक असे कंगोरे असतात
कसेही असले मेघ तरीही
सृष्टीला मात्र ते नित्य हवेच असतात..
हो,हो,हवेच असतात..!!!
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ