गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११



वेदना..

असं काहीतरी व्हावं 
वेदनेलाही पंख यावेत 
भळभळत्या जखमेलाही
तिने पंखात घेवून जावे..

वेदना ही पाऊस नसावी
जखम जाताच सुकत जाणारी
अशी वेदना मिळावी
शाश्वत क्षणांना ओलावणारी..

जखम जाते पण व्रण राहतोच
जुनं सारचं कुठे आपण विसरतो
सुखद वाटणाऱ्या क्षणांचाही
कालांतराने मग व्रण होतो..

अशी वेदना असावी
खोल खोल तळ गाठणारी
तळाला स्पर्श करूनही
पुन्हा गगनास भेदणारी..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ