बुधवार, १७ ऑगस्ट, २०११


आयुष्याचं पुस्तक

आयुष्याचं पुस्तक असचं आपण वाचायचं ..!!
सुखाचं पान आलं म्हणून 
मोहरून नाही जायचं.. 
दुःखाच पान   आलं म्हणून
मुळीच नाही कोमेजायचं..
मनाच्या अंतरिक्षात स्तब्ध उभं रहायचं ...१

पुस्तकातील छोट्या मोठ्या प्रश्नांना 
हासत हासत उत्तर द्यायचं..
वाकड्या प्रश्नांना वेळीच ठासून 
उत्तर  देवून निभाऊन न्यायचं..
उत्तर  चुकलं तरीही रडत नाही बसायचं...२

पुस्तकातील अवांतर भागाला 
अजिबात नाही  भुलायचं..
सारांशाकडे जातांना वेळोवेळी
आतल्या आरशात डोकवायचं..
उत्तर योग्य आहे कळताच सृजनाचा वेलू चढायचं ...3 
 

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ