"डोळे "
मनाची व्याकुळता कळवितात डोळे..
आनंदाची कारंजी उडवितात डोळे ..
निखार्याची उद्विग्नता भासवितात डोळे ..
हृदयातील चांदणे फुलवितात डोळे ..
विलक्षण धाक दाखवितात डोळे..
रसिकतेची उधळण करतात डोळे ..
मैफलीला रंग भरतात डोळे..
रंगाचा बेरंग ही करतात डोळे ..
प्रश्नांचा भडीमार करतात डोळे..
उत्तरासाठी तिष्टत असतात डोळे..
वात्सल्याच्या सिंधूला साठवितात डोळे..
काळजाची स्पंदन नि:शब्द वदतात डोळे..
वाट पाहण्यातील उत्कटता रेखीतात डोळे ..
आपुलकीची धार दिसताच बरसतात डोळे..
मनातलं गुपितही खोलतात डोळे..
माणसाला आतल्या जिवंतपणाने जगवितात डोळे..
"आता काहीच उरले नाही "हे कळताच मिटतात ही डोळेचं..


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ