क्वचित..
फुलपाखरे तर सारेच उडतात
फुलावर रंग ठेवणारे क्वचित असतात..
रंग तर सारेच उधळतात
इन्द्र्धनुसारखे मिसळणारे क्वचित असतात..
सूर तर सारेच छेडतात
आयुष्य छेडणारे क्वचित असतात..
हृदयात तर सारेच वसतात
निरंतर वास्तव्य करणारे क्वचित असतात..
जीवन तर सारेच जगतात
भरभरून जगणारे क्वचित असतात..
मृत्यूला तर सारेच भिडतात
अमरत्व मिळवणारे क्वचितच असतात..


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ