रविवार, १९ जून, २०११

 
मैत्रीण..
.
अशी एक मैत्रीण असावी
जिची कोणीच मैत्रीण नसावी 

सुखात माझ्या तिचं 
खूप मोहरून जावी 
अन दु:खात माझ्या 
मुसमुसून रडवी..

तिनं काही द्यावं
 ना घ्यावं 
व्यवहाराच गणित 
तिला माहित नसावं ..

व्याकुळ होवून तिनं 
मला साद घालावं 
प्रतिसाद म्हणूनही 
तिनंच मला बिलगावं..

माझ्या तिच्यात कोणतही
 द्वैत न उरावं 
मला हाक मारताच 
तिनं "ओ"म्हणावं ..

असं मैत्रीचं बंधन 
अतूट होवून जावं 
तिच्या डोळ्यात सदैव 
मी चं असावं ..

मला माहितीये
स्वार्थी झालेय मी खूप 
पण,काय करू माझी 
मैत्रप्रेमाची भागत नाही ना भूक.....
      

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ