![[ATcAAABSFOCT8RPKV2CoJ0P-P4_w64BCGPOb4T3zGgOsfRHLz052jqChxu2nzRgTh1NqePkV44QPBqZytY7Y1Bh4FZ_eAJtU9VBRDdeI-7cX7z9USoJ-m4AZB-jUIQ.jpg]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzc-2LQTWVcIeg4NgGTq7TGQbD4rTW2opAJLB_VfeFGtFIT4wsSE2U1FNDsKUsuLRCwBJZMXOHToYC2LwhJpAqnmPNUJ2NTxpmThLyxKyKIll7TuaBwhgJ8Dj5kX0c2i_ZBxbZGJCdJ8s/s320/ATcAAABSFOCT8RPKV2CoJ0P-P4_w64BCGPOb4T3zGgOsfRHLz052jqChxu2nzRgTh1NqePkV44QPBqZytY7Y1Bh4FZ_eAJtU9VBRDdeI-7cX7z9USoJ-m4AZB-jUIQ.jpg)
''डोळे -ओले''
हसशील भविष्यात कधीतरी
आठवणी आपल्या आठवून
किती केला वेडेपणा आपण
एकमेकांना मनात साठवून..
हा वेडेपणा नाही बरं का
ही तर भावनांची लाट आहे
हृदयाने हृदयाला दिलेल्या
साद प्रतीसादाची बरसात आहे..
स्वाती नक्षत्राने दिलेल्या थेंबाची
शिंपल्याने केलेल्या समर्पणाची
मैत्रीच्या नात्याला मोत्याची
हवीहवीशी सस्नेह भेट आहे..
क्षणांनी क्षणांना दिलेलं ते
अस्मितेचं देण आहे
बाकी नाही ठेवलं काहीही
हे तर प्रेमरुपी मैत्रीचं लेणं आहे..
आठवतांना सारे काही
खळखळून हसशील बरे
खळखळून हसतांना डोळे तुझेही
नक्कीच होतील ओले
होतील ओले...

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ