सोमवार, २४ जून, २०१३

 
क्षणांचा कापूर होतो,
अन मनाची निरंजन होते..।
बंद मूठ ही कुबेर होवून,
क्षितीजाला कवेत घेते..।।१।।
जिद्दीचे पंखही,
आकाशाकडे झेपावतात..।
क्षणांनाही उत्कटतेचे ,
नवे धुमारे फुटतात..।।२।।
मानससरोवराच्या लाटाही
मौन धारण करतात..
शब्दही निःशब्द होवून,
 बरचं काही बोलतात..।।३।।
असेच तर बहरत जातात,
सस्नेहाचे बगिचे..।
फुलवत जावू या जीवन , 
 स्वसोबत सकलांचे..।।४।।
-रो....

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ