गुरुवार, ६ जून, २०१३


 

इतक्यात येतोस,
इतक्यात जातोस..।
असा कसा रे तू,
 चकवा देतोस..।।
उगाच रुसतो,
उगाच डोकावतो..।
स्वतः सोबत तू, 
सृष्टीला फसवतो..।।
नको रे खेलू,
नको रे छलू..।
उगा नको रे,
असा तू टालू..।।
काहीली कशी साहू,
वाट तरी किती पाहू..।
येवूनी थोडा घे विसावा,
वसुंधरेला घाल सचैल न्हाऊ..।।
-रो..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ