सोमवार, २४ जून, २०१३

*वटवृक्षासोबत हितगुंजन..*
 कसं सांगू महागाईच्या कालात,
मी कशी बचत करते..।
पै ला पै जोडून तर मी,
त्याचाच संसार सांधते..।।१।। 
नव्या युगाची सावित्री मी,
तो सत्यवान भोला..।
पिल्लांसाठी जमा करावा लागतो ना,
लोण्याचा गोला..।।२।।
 धागा कच्चा की पक्का,
याला नाही रे महत्व..।
अंतरात तोच आहे,
जाणतो तू सत्यत्व..।।३।। 
सात जन्म कुणी पाहिले,
हाच जन्म खरा..।
अक्षय वाहू दे संसारात,
फक्त प्रीतीचा झरा..।।४।।
-रो..

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ