बुधवार, ६ जून, २०१२

"सुखी संसार "
 

आईचे वात्सल्य अन वडीलांची माया तेच जाणे

 त्यागाने जीवन मंदिर उभे केले हे न विस्मरणे..

चोचीसोबत चारा तो  देतो हे आहे सर्वांना च माहित 

 तरिही शिक्षणाच्या चार रेघोट्या लिहिल्या आपल्या वहीत..

खेळता आले असते खेळ दगड अन मातीचे

 परि आणूनी दिधले वाचवूनी पैसे गेम महागाचे..

झालो असतो मोठे केवळ खावूनी चटणी पोळी

 घेवूनी स्वपोटी चिमटा दिली मिष्ठान्ने वेळोवेळी..

आठवूनी सारे येती नयनी अश्रू  फार 

 कशी उतराई होऊ हा न सहावे भार..

नकोत त्यांना फार काही हवे दोन शब्द गोड

 परि विसरू नका त्यांना सेवतांना गोडधोड..

नका विभक्त राहू रहा त्यांच्या समवेत

 मिळेल खरा आनंद नातवंडाना त्यांच्या कवेत..

नकोत शब्द पोकळ नकोत केवळ विचार 

कृतीत उतरवा तुम्ही हा सुखी संसार...  

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ