शनिवार, २८ एप्रिल, २०१२

"बुटकी मने.." 
 
भावनेच्या सौंदर्यासही शेवटी भ्रंश असतो,
व्यावहारीकतेच्या जगात भलेपणालाच डंख पोहचतो..।

अंहकारापायी होत जातात

सर्वच अंध,
मी आणि माझे ह्यातच
असतात नेहमी दंग..।

बुटक्या मनांमध्ये इतकी कशी

शक्ती असते,
दुसर्यालाही बुटके करण्याची
मोहमयी वृत्ती असते..।

शब्दातही पेरतात असा काही मधुगंध,

भूलतात फुलपाखरेही होतात
क्षणात धुंद..।

योग्य काय अयोग्य काय मतिच जाते खुंटून,

भलेपणाचे हृदय येते अवघे दाटून दाटून..।।

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ